Pune Crime: ससून हॉस्पिटलच्या आवारातील “जुगार अड्डया’वर छापा, 15हून अधिक जुगारी अटक

पुणे – ससून हॉस्पिटल सर्व्हंट क्वार्टरर्स कंपाऊंडलगत आतील बाजूस सुरु असलेल्या बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. जुगार खेळणाऱ्या व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, ससुन हॉस्पीटल सर्व्हट क्वार्टर्स, कंपाउंड भिंतीलगत आतील बाजुस पत्र्याचे बंद खोलीत बेकायदेशीरपणे पैशांवर पत्त्यांचा जुगार सुरु असल्याची खबर मिळाली होती. त्यानूसार छापा टाकण्यात आला.
यावेळी शाबीद हसन शेख (रा. नानापेठ पुणे) व पाहीजे आरोपी आयुब हसन शेख हे त्यांचे जुगार घेणारे साथीदार राहुल रामनरेश गुप्ता (रा.विमाननगर), शुभम हरिश्चंद्र तळेकर (रा.केम, ता.करमाळा,जि.सोलापुर), सचिन सुर्यकांत गुरव (रा.अहमदनगर), सिध्दप्पा यल्लप्पा मुळगुंद (रा.मालधक्का फुटपाथ,पुणे), अजय रघुनाथ यल्लमवार (रा.सेव्हन लव्हज चौ,स्वारगेट ), अक्षय नारायण पाटील ( रा.रेल्वे स्टेशन फिरस्ता) यांचेसह मिळुन आले.
ते स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीरपणे अंदर बाहर हा पत्त्यांचा जुगार पैशांवर घेत होते. तसेच किशोर मंजुनाथ तलवार (रा. बुधवार पेठ), आनंद हनमंतराव मराठे ( रा.विगनी वस्ती,ता.दौड), राहुल काशिनाथ हजारे ( रा. भवानी पेठ), जावेद चॉंदखान पठाण (रा. गोखलेनगर)राकेश गोपाळ राठोड(रा.क्विन्स गार्डन,आउट हाउस पुणे), सलमान हुसेन शेख (रा. गुरुवार पेठ), अमित मारुती पुजारी (रा.ताडीवाला रोड )उमेश गोरख सावंत ( रा. गल्ली नं.,पाटील इस्टेट,शिवाजीनगर),रफिक अब्दुल शेख ( रा. मंगळवार पेठ ), हनुमंत धोडींबा मोरे (रा.दौड,ता.दौड), संतोष गुरुलिंग चनशेट्टी (रा.मिल्ट्री कॉलणी,हडपसर) हे पत्त्यांचा जुगार खेळत असताना 1 लाख 48 हजार रुपयांच्या मुद्देमालासह मिळुन आले. त्यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम अन्वये बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह-आयुक्त, डॉ.रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उप-आयुक्त श्रीनिवास घाडगे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक सामाजिक सुरक्षा विभाग, तसेच सामाजिक सुरक्षा विभागाकडील पोलीस उपनिरीक्षक मनिषा पुकाळे, अंमलदार आण्णा माने, हणमंत कांबळे, अश्विनी केकाण, संदिप कोळगे यांनी केली आहे.





