पुणे- शहरात दिवसभरात 196 नव्या करोना बाधितांची नोंद करण्यात आली असून, बरे झालेल्या 218 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आजपर्यंत झालेल्या 32 लाख 33 हजार 91 स्वॅब टेस्टमध्ये 4 लाख 98 हजार 183 नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यातील 4 लाख 87 हजार 165 बाधित बरे झाले. परंतु 8 हजार 977 बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये गेल्या 24 तासांत शहरात मृत पावलेल्या चार जणांचा समावेश असून, याशिवाय हद्दीबाहेरील एकाचा मृत्यू झाला आहे. सध्या 2 हजार 041 बाधित सक्रिय असून, त्यातील 217 बाधितांची प्रकृती गंभीर आहे.