पुणे – गेल्या 24 तासांतील नव्या करोना बाधितांची संख्या 241 झाली असून, 7 बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यातील तिघे पुण्याबाहेरील आहेत. 239 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आता शहरातील एकूण बाधितांची संख्या आता 4 लाख 97 हजार 853 झाली आहे; तर त्यातील 4 लाख 86 हजार 660 जण करोनामुक्त झाले आहेत. त्यात शुक्रवारी डिस्चार्ज मिळालेल्या 239 जणांचा समावेश आहे. तर, आतापर्यंत 8 हजार 969 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
सध्या, 2 हजार 224 सक्रीय बाधित असून, त्यातील 214 बाधितांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर 296 जणांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. गेल्या 24 तासांत 8 हजार 329 संशयितांची स्वॅब टेस्ट झाली आहे. तर आजपर्यंत 32 लाख 20 हजार 457 स्वॅब टेस्टचा टप्पा शहरात पार झाला आहे.