पुणे –शहरात गेल्या चोवीस तासांत 257 करोनाबाधित आढळले असून, 163 रुग्ण बरे झाले आहेत. तर पुण्यातील पाच रुग्णांसह 15 जणांचा मृत्यू झाला आहे.
सक्रिय रुग्णसंख्या 2 हजार 311 वर पोहोचली आहे. गेल्या पाच दिवसांत सक्रिय बाधितांच्या संख्येत सुमारे 500 ने वाढ झाल्याने चिंतेत भर पडली आहे. 206 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर 282 जणांना ऑक्सिजन लावले आहे. दरम्यान चोवीस तासांत 9 हजार 685 संशयितांची स्वॅब टेस्ट करण्यात आली आहे.