पुणे – शहरात गेल्या 24 तासांत 244 करोनाबाधित आढळले असून बरे झालेल्या आणि दिवसभरात डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या 205 आहे. गेल्या 24 तासांमधील बाधित मृतांची संख्या 9 झाली आहे.
बाधित मृतांमध्ये 4 शहराबाहेरील आणि पाच जण पुण्यातील आहेत. शहरातील सक्रिय रुग्णसंख्येतही शुक्रवारीही सुमारे तीसने वाढ झाली असून, ती 2 हजार 508 झाली आहे. गेल्या दोन दिवसांत ही संख्या वेगाने वाढत आहे; त्यामुळे चिंतेत भर पडली आहे.
सक्रिय बाधितांमधील 204 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर, 289 जणांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले असून, या रुग्णांची संख्याही वाढली आहे. आतापर्यंत शहरात 4 लाख 96 हजार 344 जण बाधित झाले असून, त्यापैकी 4 लाख 84 हजार 896 जण बरे झाले आहेत. तर 8 हजार 940 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, 24 तासांत 9 हजार 011 संशयितांची स्वॅब टेस्ट करण्यात आली आहे. आजपर्यंत 31लाख 61 हजार 962 संशयितांची स्वॅबटेस्ट झाली आहे.