Pune : झोपडपट्टी वसाहतीचा सर्वांगिण विकास करणार; उमेदवार अश्विनी कदम यांचे नागरिकांना आश्वासन

बिबवेवाडी – झोपडपट्टी वसाहतीमधील मुलांसाठी सांस्कृतिक जगाशी जोडणारा इंद्रधनुष्य प्रकल्प राबविणार आहे. पर्वती मतदारसंघातील मुलांसाठी एक उज्ज्वल भविष्य निर्माण करण्याचा संकल्प आपल्याला सगळ्यांना मिळून करायचा आहे. प्रत्येक झोपडपट्टीवासी यास त्याचे हक्काचे मोफत घर देण्यास मी कटिबद्ध आहे.
प्रभागनिहाय व्यक्तींच्या घरी भेटी घेऊन पर्वतीच्या सर्वांगीण विकासासाठी अनुक्रमांक एक समोरील तुतारी वाजविणारा माणूस, या चिन्हसमोरील बटन दाबून मतदानाचे करावे, असे आवाहन महाविकास आघाडी उमेदवार अश्विनी कदम यांनी नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले आहे.
महाविकास आघाडी उमेदवार अश्विनी कदम यांच्या प्रचारार्थ भव्य पदयात्रा प्रभाग क्र. 36 – लोअर इंदिरानगर, मार्केटयार्ड भागातील नागरिकांशी संवाद साधत घरोघरी संपर्कावर भर दिला. या भेटींमध्ये मतदारसंघातील प्रथितयश व्यक्तींच्या भेटीगाठी घेऊन मतदानाचे आवाहन केले, त्याला नागरिकांकडूनही उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद मिळत असून ताई, तुमचा विजय नक्कीच आहे. आम्ही देखील जास्तीत जास्त मतदानासाठी प्रयत्न करत आहोत, अशा भावना व्यक्त होत आहेत.
बहुउद्देशीय कामगार संघटनेने अश्विनी कदम यांना जाहीर पाठिंबा दर्शवला. यावेळी अभय छाजेड,बाळासाहेब ओसवाल, बंडू नलावडे, शिवसेना पर्वती विभागप्रमुख अमोल रासकर, मृणालिनी वाणी, भाऊ मोहोळ, सोनाली उजागरे, विद्या ताकवले, प्रमोद कोठावळे, नरेश बागुल, संजय दामोदरे, कृष्णा सोनकांबळे, देडेताई, रमेश सोनकांबळे, सुनिल जगताप, प्रशांत शिरसागर, ऋषिकेश भुजबळ, श्रीकांत मेमाणे, निलेश जाढव, फारुख शेख, मंगेश जाढव,अभिजित भिसे, निलेश पवार, कुमार धोंगडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.





