पुणे – सीएनजी, पीएनजी गॅसच्या दरात दीड रुपयांनी वाढ

पुणे – सीएनजी (कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस) आणि पीएनजी (पाईप नॅचरल गॅस) गॅसच्या दरात वाढ करण्यात आली आहे. सीएनजी आणि पीएनजी दरात प्रति किलोमागे दीड रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

केंद्र सरकारकडून महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडला (एमएनजीएल) केल्या जाणाऱ्या गॅस पुरवठ्याच्या दरात 10 टक्‍क्‍यांनी वाढ केली आहे. त्यानुसार एमएनजीएलने पुण्यात दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यापुर्वी ऑक्‍टोबर 2018 मध्ये गॅसच्या दरात वाढ केली होती.

महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडकडून बुधवारपासून शहरातील सीएनजी आणि घरगुती वापरासाठी असलेला पाईप नॅचरल गॅस या दोन्हींच्या दरात दीड रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. शासनाने या गॅसची किंमत वाढवल्याने पर्यायाने सीएनजीच्या तसेच घरगुती वापरासाठीचा पीएनजी महाग झाला आहे. यामुळे आता शहरातील नागरिकांना सीएनजी तसेच पीएनजीसाठी जादा पैसे मोजावे लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)