Pune : खडकवासला, पवना धरणांच्या जागेवर अतिक्रमण झाले नसल्याचा दावा

पुणे : खडकवासला आणि पवना धरणांच्या बुडीत क्षेत्रात व जलसंपदा विभागाच्या हद्दीत कोणतेही बांधकाम झाले नसल्याचा दावा जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.
तसेच या धरणाच्या क्षेत्रात अतिक्रमण झाले नसल्याने धरणांमधील पाणी साठवण क्षमतेवर परिणाम झालेला नाही. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील पाणी पुरवठयावर कोणताही परिणाम झालेला नसल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.
अधिवेशनात खडकवासला व पवना धरणांच्या क्षेत्रातील जमिनीवर अतिक्रमण झाल्याबाबत पाच आमदारांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना विखे पाटील यांनी ही माहिती दिली. मागील वर्षी धरणांच्या बाजूने अतिक्रमण धारकांना नोटीसा दिल्या होत्या.
तसेच काही अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच धरण व कालवे या ठिकाणी झालेल्या अतिक्रमणांवर कारवाई करण्याच्या सूचना महसुल, गृह विभाग आणि महानगरपालिका यांना देण्यात आल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.





