प्रभात वृत्तसेवा पुणे – पोलीस चौकीपासून पन्नास ते साठ फुट अंतरावर असलेली आठ दुकाने चोरट्यांनी फोडली. चोरट्यांनी रोकड आणि अन्य साहित्य असा ४ लाखांचा ऐवज पळवला आहे. याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे फुरसुंगी पोलिसांत दाखल झाले आहेत.विशाल सिताराम यादव (वय.३३,रा.मळाईपार्क फुरसूंगी) यांच्या भेकराईनगर चौकातील शिव मोबाईल शॉपी नावाचे दुकान रविवारी पहाटे चोरट्यांनी फोडले. दुकानातील २ लाख ७४ हजार रुपये पळवले. तसेच शॉपीला लागून असलेली इतर काही दुकाने चोरट्यांनी फोडली.सोहनलाल फुआराम चौधरी (वय.४४,रा. वाघजाई कॉलनी गंगानगर फुरसूंगी) यांच्या तक्रारीनुसार पुरबजी ट्रेडींग आणि इतरांच्या दुकानाच्या छताला लावलेले फॅन काढून चोरट्यांनी आत प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील १ लाख २७ हजार रुपये पळवून नेले. चोरट्यांनी मोबाइल शॉपी,चहाचे दुकान, मिठाईचे दुकान अशी विविध आठ दुकाने फोडली आहेत.