पुणे – अखेर ‘त्या’ रानगव्याचा दुर्दैवी मृत्यू

Updated On:

पुणे(प्रतिनिधी) – पुण्यातील कोथरूडमध्ये महात्मा सोसायटीत आज (बुधवार) सकाळी रानगवा (Indian Gaur) दिसून आला. रानगवा दिसल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली होती. त्यानंतर वन विभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं होतं. पाच तासाच्या  अथक प्रयत्नानंतर रानगवाला पकडण्यात वन विभागाला यश मिळालं होतं. पण, अखेर त्या रानगव्याचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे.  

कोथरूडमध्ये रानटी गवा शिरल्याची बातमी समजताच महात्मा सोसायटीच्या परिसरात अनेक बघ्यांनी गर्दी केली होती. यामध्ये हा रानटी गवा काहीसा भेदरला. त्यातच रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान वनविभागाची त्याला धरण्याची धडपड आणि बघ्यांची झालेली गर्दी यामुळे रानगवा घाबरून सैरावैरा धावू लागला. यामध्ये रानगवा जखमी झाला होता आणि त्याच्या तोंडातून रक्त वाहत होतं. त्यानंतर दोन- तीनवेळा त्याला इंजेक्शन देण्यात आले.

यामुळे धावाधाव झाल्यामुळे घाबरून (धाप लागून) मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे. अशी माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे. पण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे देखील वनविभागाकडून सांगण्यात आले आहे.

आणखी संबंधित बातम्या

Pune News: रस्ते मोकळे केले अन् पदपथ अडविले! गणेशोत्सवानंतर मध्यवर्ती पुण्यातील रस्त्यांवर कोंडी

2026-09-29 06:45:13

Pune News: रस्ते मोकळे केले अन् पदपथ अडविले! गणेशोत्सवानंतर मध्यवर्ती पुण्यातील रस्त्यांवर कोंडी

PMC News: पुणेकरांनो सावधान! सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पडणार महागात; महापालिका दंडाच्या रकमेत वाढ करणार

2026-09-29 05:30:30

PMC News: पुणेकरांनो सावधान! सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पडणार महागात; महापालिका दंडाच्या रकमेत वाढ करणार

Pune Ganeshotsav: गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी पुणेकरांची गर्दी! सजावटीचे आणि पूजा साहित्य घेण्यासाठी नागरिकांची झुंबड

2026-09-13 05:30:19

Pune Ganeshotsav: गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी पुणेकरांची गर्दी! सजावटीचे आणि पूजा साहित्य घेण्यासाठी नागरिकांची झुंबड

Nepal Flash Floods: नेपाळ संकटात, भारत मदतीला! पुलापासून DNA टीमपर्यंत काय-काय पाठवलं?

2026-08-30 12:59:48

Nepal Flash Floods: नेपाळ संकटात, भारत मदतीला! पुलापासून DNA टीमपर्यंत काय-काय पाठवलं?

Nepal Flood : नेपाळमधील महाप्रलयात 288 भारतीय बेपत्ता? 21 जणांची सुटका; परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्त्वाची अपडेट

2026-08-27 16:22:16

Nepal Flood : नेपाळमधील महाप्रलयात 288 भारतीय बेपत्ता? 21 जणांची सुटका; परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्त्वाची अपडेट