पुणे – उन्हाळ्यानिमित्त चेन्नई सेंट्रल-अहमदाबाद विशेष रेल्वे

पुणे – उन्हाळी सुट्ट्या आणि प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन चेन्नई सेंट्रल ते अहमदाबाद मार्गावर विशेष साप्ताहिक रेल्वे सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ही गाडी पुणेमार्गे जाणार आहे.

चेन्नई सेंट्रल ते अहमदाबाद (06051) ही विशेष गाडी दि. 6 एप्रिल ते दि. 29 जून या कालावधीमध्ये धावणार आहे. या कालावधीत दर शनिवारी चेन्नई स्थानकाहून रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी सुटणार असून, पुणे स्थानकावर रविवारी सायंकाळी 5 वाजून 15 मिनिटांनी येणार आहे. तर अहमदाबाद स्थानकावर ही गाडी सोमवारी पहाटे 5 वाजून 45 मिनिटांनी पोहोचणार आहे.

अहमदाबाद ते चेन्नई सेंट्रल (06052) ही विशेष गाडी दि. 8 एप्रिल ते दि. 1 जुलैदरम्यान धावणार आहे. ही गाडी दर सोमवारी अहमदाबाद येथून सकाळी 9 वाजून 40 मिनिटांनी सुटेल, त्याचदिवशी रात्री 9 वाजून 5 मिनिटांनी पुणे स्थानकावर येणार आहे. चेन्नई सेंट्रल येथे दर मंगळवारी सायंकाळी 5 वाजून 10 मिनिटांनी पोहोचेल. या गाडीच्या 26 फेऱ्या होणार असून गाडी पेरांबूर, रेणीगुंठा, गुंटकल, सोलापूर, दौंड, पुणे, लोणावळा, कल्याण, वसई रोड, वापी आदी स्थानकांवर थांबणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.