Pune : रस्ता रुंदीकरणमध्ये वृक्षतोड केल्याने गुन्हा दाखल
Updated On:

पुणे : रस्ता रुंदीकरणाचे काम केल्याप्रकरणी तेजज्ञान फाऊंडेशनच्या डॉ. मकरंद रामदास परांजपे यांच्याविरुद्ध नांदेड सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीएमआरडीएचे उद्यान सहायक सुरेश रावते यांनी तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सणसनगर ते मनन आश्रम असे रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. तेथे रस्तारुंदीकरणाच्या कामास अडथळा ठरत असलेली झाडे डॉ. परांजपे यांनी तोडल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार फिर्यादी रावते यांनी तेथे प्रत्यक्ष पाहणी केली तसेच पंचनामा केला. त्याचा अहवाल वृक्ष प्राधिकरण समितीला पाठवला गेला. यानंतर डॉ. परांजपे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार वृक्षसंवर्धन आणि जतन अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





