पुणे कॅन्टोन्मेंट सहकारी बँकेचा 53 वा वर्धापन दिन व कर्ज योजना शुभारंभ उत्साहात संपन्न

पुणे : पुणे कॅन्टोन्मेंट सहकारी बँकेचा ५३ वा वर्धापन दिन समारंभ आणि सूक्ष्म, लघु व मध्यम कर्ज योजनेचा शुभारंभ कार्यक्रम बुधवारी, परमार डिस्पेन्सरी कॅम्प, पुणे येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. बँकेने यशस्वीपणे ५२ वर्षे पूर्ण करून ५३व्या वर्षात पदार्पण केले आहे.
या प्रसंगी बँकेचे संस्थापक संचालक व विद्यमान अध्यक्ष कैलासराव (मामा) सखाराम कोद्रे, उपाध्यक्ष साहेबराव विठ्ठलराव लोणकर, बोर्ड ऑफ मॅनेजमेंट अध्यक्षा स्मिता शैलेश लडकत, संचालक मंडळाचे सदस्य कैलास (भाऊ) रामचंद्र कोद्रे, मंगल शिवाजीराव टिळेकर, शांताराम कोंडिराम चौधरी, नंदकिशोर तुकाराम विडकर, देवेंद्र सुरेश भाट, अॅड. अविनाश केरवा कवडे, अॅड. दिलीप महादेव जगताप, संदीप (दादा) कैलासराव कोद्रे, अनिल जगन्नाथ आवनावे, ज्ञानेश्वर रामभाऊ मोझे, किशोर फत्तु संघेलिया, संतोष मधुकर पेठे, अमित अजित गिरमे, सल्लागार जीवन दत्तात्रय म्हेत्रे, बोर्ड ऑफ मॅनेजमेंट सदस्य के. सी. मिश्रा, अविनाश साहेबराव वनमाले, वी. वी. मोहंती, सेवक प्रतिनिधी बाळु पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जवळकर, महाव्यवस्थापक अस्लम तांबोळी, सहाय्यक महाव्यवस्थापक सुनिल जमदाडे, सेवक वर्ग, दैनंदिन ठेव प्रतिनिधी आणि सभासद उपस्थित होते.
बँकेच्या अध्यक्षांनी आपल्या भाषणात सभासद आणि खातेदारांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच त्यांच्या व्यवसायवृद्धीसाठी संचालक मंडळ कटिबद्ध असल्याचे सांगितले. याच उद्देशाने बँकेने कमी व्याजदरात सुलभ सूक्ष्म, लघु व मध्यम कर्ज योजना सुरू केली आहे. या योजनेचे उद्घाटन अध्यक्ष कैलासराव कोद्रे यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी खातेदार वागवान फरीन इशिकी, ओम अमोल साळवे, फुलाबाई कांबळे, समिर शेख आणि वागवान इशतिकी अब्दुल यांना कर्ज योजनेचे धनादेश प्रदान करण्यात आले. बँकेने सर्व सभासद आणि खातेदारांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.


