पुणे – पुणे शहरातील विविध भागात घरफाेडीच्या घटना सातत्याने घडत राहत असून अद्याप चाेरटयांवर नियंत्रण आण्णयात पाेलीसांना अपयश आले आहे. येरवडा परिसरातील माजी आमदार रामभाऊ माेझे यांचे पुतण्यांचे घरावर अनाेळखी चाेरटयांनी डल्ला मारत तब्बल एक किलाे साेन्याचे दागिन्यांसह ५३ लाख ४६ हजार रुपयांचा माैल्यवान ऐवज चाेरुन नेला आहे.
याप्रकरणी येरवडा पाेलीस ठाण्यात हरिश्चंद्र ऊर्फ राजू मनाेहर माेझे (वय-४९, रा.संगमवाडी,पुणे) यांनी अज्ञात चाेरटयां विराेधात फिर्याद दिली आहे. राजू माेझे व त्यांचा भाऊ माेहन माेझे हे कुटुंबा समवेत कामा निमित्त बाहेरगावी गेले असताना तीन सप्टेंबर ते पाच सप्टेंबर दरम्यान त्यांचे घराचा दरवाजा कुलुप लावून बंद हाेता.
परंतु माेझे कुटुंबीय घरात नसल्याचे हेरुन चाेरटयांनी दरवाजाचा कडी काेयंडा उचकटून घरात प्रवेश करत, राजू माेझे यांचे बेडरुम मधील कपाटातील लाॅकर ताेडून त्यातील ४० लाख २० हजार रुपयांचे साेने-चांदीचे दागिने, महागडी घडयाळे चाेरुन नेली. तर माेहन माेझे यांचे घरातील लाॅकर मधून १३ लाख २६ हजार रुपये किंमतीचे दागिने व राेकड असा माैल्यवान ऐवज पळवून नेला.
गावावरुन माेझे कुटुंबीय घरी आल्यानंतर सदर प्रकार उघडकीस आला. याबाबत माहिती मिळताच, येरवडा पाेलीस घटनास्थळी दाखल हाेऊन त्यांनी जागेचा पंचनामा करत चाेरटयांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत येरवडा पाेलीस पुढील तपास करत आहे.