Pune : नुकत्याच इंदोर येथे पार पडलेल्या “इंडियन नॅशनल रॅली स्प्रिंट चॅम्पियनशिप दुचाकी” च्या क्वालिफायर राऊंड मध्ये पुण्यातील जवळपास ३ दशकांपासून नावाजलेले रायडर “पिंकेश ठक्कर” याने तब्बल ४ रेसिंग कॅटेगरी मध्ये पोडियमी मिळवून पुण्याची शान राखली आहे. भारतभरातून आलेल्या रायडर्स बरोबर अटीतटीची आणि अति-गतीची अशी रोमांचक स्पर्धा करून “ग्रुप बी रॉयल एनफिल्ड क्लास अपटू ५०० सी. सी.” – प्रथम क्रमांक, “ग्रुप बी स्कूटर क्लास अपटू २१० सी. सी.” – प्रथम क्रमांक, “ग्रुप बी २६० सी.सी. अपटू ५०० सी. सी.” – द्वितीय क्रमांक आणि “ग्रुप बी अपटू १६५ सी. सी.” – तृतीय क्रमांक या चार रेसिंग क्लास मध्ये विजेतेपद मिळवल्याबद्दल पुण्यातील विविध रेसिंग ग्रुप्स ने पिंकेश ठक्कर याला आगामी काळातील बाईक रेसिंग स्पर्धांसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.