Pune fire News : रविवार पेठेत बोहरी आळीत इमारतीत आग; अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल
Pune fire News : पुण्याच्या रविवार पेठेतील बोहरी आळी परिसरात पाच मजली इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर आग लागली. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

Pune fire News : रविवार पेठेतील बोहरी आळी परिसरातील पाच मजली इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर शुक्रवारी रात्री आग लागल्याची घटना घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझविण्याचे काम सुरू आहे.
प्राथमिक माहितीनुसार, इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर दुकानातील माल ठेवण्यात आला होता. त्यालाच आग लागल्याचे समजते. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने या घटनेत अद्याप कोणतीही जखमी व्यक्ती अथवा जीवितहानी झाल्याची माहिती नाही. आगीमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.





