पुणे : शांततेच्या वातावरणाला बोगस मतदानाचे गालबोट; नागरिकांचा संताप
Updated On:

पुणे – संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. शांततेच्या वातावरणात मतदान पार पडत असताना पुण्यातील मुंढवा येथे बोगस मतदानाचे गालबोट लागले आहे.
मुंढवा येथील राजश्री शाहू विद्यालयात बोगस मतदान करण्यात आले. त्याविरोधात नागरिकांचा संताप अनावर झाल्याने मतदान केंद्रावर गोंधळ निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.





