पुणे – बावधन खुर्द व बुद्रुक येथील ग्रामदैवताचा आशीर्वाद घेऊन बावधन–भुसारी कॉलनी परिसरात भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार किरण दगडे-पाटील, रूपाली सचिन पवार, अल्पना गणेश वरपे आणि दिलीप वेडेपाटील यांनी प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिकांसह सोसायटीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. घराघरापर्यंत असलेल्या संपर्कामुळे आयोजित पदयात्रेत उमेदवारांना महिला भगिनींनी औक्षण करीत शुभेच्छा दिल्या. नागरिकांशी संवाद साधताना प्रभागात केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा आणि भविष्यातील ठोस विकास आराखडा मांडण्यात आला. तसेच, प्रशासकीय काळात राहिलेल्या विकासकामाना गती देत, लोकसहभागातून बावधन, भुसारी कॉलनी, वेदभवन, महात्मा सोसायटी, इंदिरा शंकर नगरी यासह शास्त्रीनगर, सागर कॉलनी आदी वास्ती भागासह संपूर्ण प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याचे आश्वासन भाजपच्या उमेदवारांनी दिले. यावेळी महिला, ज्येष्ठ नागरिक व युवक पदयात्रेत सहभागी झाले होते.