Pune : फेलोशीपसाठी बार्टीने लवकर जाहिरात द्यावी

पुणे : बार्टीच्या पीएचडी विद्यार्थ्यांना २०२२ नंतर फेलोशीप मिळाली नसल्याने संशोधनात अडचणी येत आहेत. त्यामुळे फेलोशिपसाठी लवकर जाहिरात देण्याची मागणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीने बार्टीकडे केली आहे.
बार्टीकडून अनुसूचित जातीतील पीएचडी करणाऱ्यांना फेलोशिप दिली जाते. गेल्या काही वर्षात फेलोशिप मिळालेली नसल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलन केले आहे.
या आंदोलनांनंतर अनेकांना फेलोशिप मिळाली असली तर त्यातही बऱ्याच अडचणी आल्या आहेत.२०२२ पर्यंत फेलोशिप मिळाली असली तरी त्यानंतर विद्यार्थ्यांच्या फेलोशिपसाठी बार्टीने अजून जाहिरात काढलेली नाही.
फेलोशिपसाठीची जाहिरात लवकरात लवकर काढावी या मागणीसाठी विद्यापीठ कृती समितीने बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांची भेट घेतली.महाज्योतीप्रमाणे सेट, नेट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन बार्टीने द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.




