पुणे : प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक गुरुवर्य शंकरराव कानिटकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा गुरुवर्य शंकरराव कानिटकर पुरस्कार कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार समारंभ दि. १० एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता संस्थेच्या सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डाॅ. पराग काळकर, आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे कार्याध्यक्ष डाॅ. गजानन एकबोटे हे भूषविणार आहेत. याप्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे सचिव प्रा. शामकांत देशमुख यांनी केले आहे.