पुणे- लाचेची रक्कम घेऊन फरार झालेला सहायक पोलीस फौजदार स्वत:हून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) हजर झाला. दरम्यान, त्याला न्यायालयात हजर केले. त्यावेळी विशेष न्यायाधीश एस.बी.हेडाऊ यांनी दि. 13 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, याच प्रकरणात अटक केली महिला पोलीस उपनिरीक्षक हिला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
अशोक बाळकृष्ण देसाई (वय 52) असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे ऍड. रमेश घोरपडे यांनी काम पहिले. तर बचाव पक्षातर्फे ऍड. सुधीर शहा, ऍड. सुहास कोल्हे आणि ऍड. अनिकेत येवले यांनी बाजू मांडली. देसाई याला न्यायालयात हजर केले.
त्यावेळी गुन्ह्यातील लाचेची रक्कम घेऊन तो पळून गेला होता. हजर होताना त्याने ती रक्कम आणणेली नाही. त्या रकमेचा आणि फरार कालावधीत तो कोठे होता, याचा शोध घेण्यासाठी, तसेच, तो आणि यापूर्वी अटक केलेल्या सोळुंके यांच्यात मोबाईलवरून संवाद झाला आहे. त्यामुळे त्याचा मोबाइल हस्तगत करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी पक्षातर्फे करण्यात आली.