पुणे – रिक्षा परवान्याच्या अपॉईंटमेंट फुल्ल

पुणे – नवीन रिक्षा परवान्यासाठी अर्ज केल्यानंतर 2020 वर्षातील तारीख प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मिळत आहे. त्यामुळे प्रलंबित अर्जांच्या संख्येत भर पडत आहे. यामुळे 2020 मध्ये ऑनलाइन तारीख मिळालेल्यांची या वर्षाअखेरपर्यंत कागदपत्रे तपासणी करण्यात येणार आहे.

नवीन अर्जदारांना कागदपत्रे सादर करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अपॉईंटमेंट देण्यात येते. तारीख मिळाल्याच्या दिवशी आरटीओ येथे कागदपत्रांची तपासणी करावी लागते. मात्र, सद्यस्थितीत अर्जदारांना थेट पुढील वर्षातील तारीख मिळत आहे. यामुळे रिक्षा परवान्यासाठी वाट पाहवी लागणार आहे. यामुळे वाढणाऱ्या प्रलंबित अर्जांचा विचार करुन अर्जदारांना दिलासा मिळावा, यासाठी यावर्षीच कागदपत्र तपासणी पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून त्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

ज्या अर्जदारांना पुढील वर्षातील अपॉईंटमेंट मिळाली आहे, अशा अर्जदारांसाठी संगम पुलाजवळील प्रादेशिक परिवहन कार्यालयात 13 मे ते 12 जुलैदरम्यान कागदपत्रे तपासणी होणार आहे. यासाठी अर्जदारांना सकाळी 10.30 ते 12 वाजेपर्यंत कागदपत्रांसह आरटीओ कार्यालयात हजर राहावे लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.