Pune : राहुल गांधींसमोर झुकावे लागले पुणे शहर काँग्रेसकडून घोषणा

पुणे : केंद्र सरकारकडून जातीय जनगणनेची घोषणा झाल्यानंतर हा एक प्रकारे राहुल गांधींचा विजय असल्याचे म्हणत पुणे शहर काँग्रेसने येरवड्यात जल्लोष केला.
जिसकी जितनी आबादी, उसकी उतनी हिस्सेदारी हा समाज परिवर्तननाचा मूलमंत्र दिलेल्या राहुल गांधींनी गेल्या दहा वर्षांपासून संसदेत तसेच इतर अनेक ठिकाणी जातीय जनगणनेची मागणी केली होती. मात्र, भाजपच्या नेत्यांनी खालच्या पातळीवर जात गांधींची टीका आणि अवहेलना केली. मात्र, अखेर मोदी सरकारला झुकावे लागले, असे म्हणत काँग्रेसकडून हा जल्लोष करण्यात आला.
यावेळी कार्यकर्त्यांनी ‘देश की आंधी, राहुल गांधी’, ‘सामाजिक न्यायाच्या क्रांतीचे नवे नायक राहुल गांधी’, ‘झुकता हे मोदी, झुकाने वाला राहुल गांधी चाहीए’ या घोषणा देऊन व मिठाई वाटून हा जल्लोष करण्यात आला.
पुणे शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष अरविंदभाऊ शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चिटणीस अभय छाजेड, येरवडा ब्लॉक अध्यक्ष रमेश सकट, पुणे शहर सरचिटणीस विल्सन चंदेवळ, पुणे शहर अल्पसंख्याक अध्यक्ष समीर शेख, काँग्रेस नेते डॅनियल लांडगे, मा. स्वीकृत नगरसेवक राकेश चौरे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सोशल मीडियाचे अमित कांबळे, प्रभाग अध्यक्ष डाॅ. रमाकांत साठे, विजय साबळे, हासिना आपा सय्यद, आमर मांडलिक, गणेश मिसाळ इत्यादी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.





