Pune: शहरातील अक्षर स्पर्श मतिमंद विद्यालयात “आकाश ऍडव्हर्टीसिंग”च्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त आणि आकाश यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत आकाश ऍडव्हर्टीसिंगचे प्रॉपरायटर आणि त्यांच्या सहचारिणी यांच्या हस्ते विद्यालयातील विद्यार्थ्यांना धान्य व खाऊचे वाटप करण्यात आले. या वेळी मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेले आनंदी हास्य पाहून उपस्थितांना समाधान वाटले. विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले. तसेच विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी आकाश यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.