पुणे : अजित पवार यांनी सपत्नीक घेतले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन

Updated On:
पुणे : अजित पवार यांनी सपत्नीक घेतले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन

पुणे : पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे आज विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सपत्नीक दर्शन घेतले आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने ट्रस्टच्या 130 व्या वर्षी गणेशोत्सवात श्री पंचकेदार मंदिर साकारण्यात आले आहे. यावेळी अजित पवार यांनी गणपतीची आरती केली.

पुण्यातील विविध मानाच्या गणपती बाप्पाचे अजित पवार यांनी आज दर्शन घेतले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. उद्धव ठाकरेंचे आमचे सरकार असते तर हाच निर्बंधमुक्त उत्सव साजरे करण्याचा निर्णय झाला असता असेही अजित पवार यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांना बाप्पाकडे काय मागणं केले असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी अजित पवार म्हणाले की, बाप्पाकडे काही मागणं केलं नाही. भक्तीभावानं बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. प्रत्येकवेळी बाप्पाकडं मागणं केलेचं पाहिजे असे नाही असेही अजित पवार म्हणाले. मनमोकळेपणानं दर्शनाला जावं, सारखेचं त्यांना साकडं घालून त्यांना अडचणीत कशाला आणायचे आहे, असेही अजित पवार म्हणाले.

आणखी संबंधित बातम्या

Sunetra Pawar on Nana Patekar: "अभिनयाचा एक युगपुरुष हरपला…!" ; अजित पवारांसोबतचा फोटो शेअर करत सुनेत्रा पवारांनी नानांना वाहिली श्रद्धांजली

2026-10-08 09:35:23

Sunetra Pawar on Nana Patekar: "अभिनयाचा एक युगपुरुष हरपला…!" ; अजित पवारांसोबतचा फोटो शेअर करत सुनेत्रा पवारांनी नानांना वाहिली श्रद्धांजली

Navratri Festival 2026 : श्री महालक्ष्मी मंदिराचा सार्वजनिक नवरात्रोत्सव 11 ऑक्टोबरपासून

2026-10-06 18:54:29

Navratri Festival 2026 : श्री महालक्ष्मी मंदिराचा सार्वजनिक नवरात्रोत्सव 11 ऑक्टोबरपासून

Pune Water Cut: पुणेकरांनो १५ ऑक्टोबरपासून पाणी कपात होणार? महापालिका प्रशासनाची मोठी अपडेट समोर

2026-10-06 07:00:30

Pune Water Cut: पुणेकरांनो १५ ऑक्टोबरपासून पाणी कपात होणार? महापालिका प्रशासनाची मोठी अपडेट समोर

PMC News: आरटीआय सप्ताहाच्या निमित्ताने महापालिकेला आली जाग; प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढण्याचे आदेश

2026-10-06 06:30:39

PMC News: आरटीआय सप्ताहाच्या निमित्ताने महापालिकेला आली जाग; प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढण्याचे आदेश

Pune Water Supply: पुणेकरांच्या पाण्याचे नियोजन कळवा! अनिश्चित पर्जन्यमानामुळे महापालिकेची पाटबंधारे विभागाकडे धाव

2026-10-06 06:00:53

Pune Water Supply: पुणेकरांच्या पाण्याचे नियोजन कळवा! अनिश्चित पर्जन्यमानामुळे महापालिकेची पाटबंधारे विभागाकडे धाव