Pune : मराठी लघुलेखन अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु

पुणे : औंध येथील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थमध्ये प्रवेश सत्र २०२५- २६ करिता स्टेनोग्राफी मराठी लेघुखनसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. प्रवेशाकरिता https://msbsvet.edu.in या लिंकवरून प्रशिक्षणार्थ्यांनी ३१ जुलैपर्यंत ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे.
ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत तसेच प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित प्रती संस्थेमध्ये १ ऑगस्टपर्यंत जमा कराव्यात. गुणवत्ता यादी ४ ऑगस्ट रोजी तयार करण्यात येणार असून, प्रत्यक्ष प्रवेशाची कार्यवाही ६ ऑगस्ट रोजी संस्थेच्या मुख्य इमारतीच्या कौशल्य हॉल येथे होणार आहे.
प्रवेशित उमेदवारांचे नियमित प्रशिक्षण ७ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरावेत, असे आवाहन छत्रपती शिवाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक स. मा. धुमाळ यांनी केले आहे.





