पुणे : काँग्रेस नेत्या खा. सोनिया गांधी आणि खा. राहुल गांधी यांच्यावरील ईडीची कारवाई ही केवळ राजकीय सुडबुद्धीनेच केली जात असून, केंद्रातील भाजप सरकार लोकशाहीत विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केला. या निषेधार्थ काँग्रेसतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, पुणे येथे आंदोलन करण्यात आले. या वेळी माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, वीरेंद्र किराड, संजय बालगुडे, मुख्तार शेख, गोपाळ तिवारी, नगरसेवक अजित दरेकर, रफिक शेख, अविनाश बागवे, स्वाती शिंदे, प्रियंका रणपिसे, अनिता धिमधिमे, ॲड. राजश्री अडसूळ, प्रियंका मधाळे, शिवानी माने, कांचन बालनायक, सुंदर ओव्हाळ यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तर केवळ स्वायत्त सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून व दबाव आणून मोदी सरकार विरोधी पक्षास बदनाम करून नेस्तनाबूत करण्यात धन्यता मानत असल्याची टिका गोपाळ तिवारी यांनी यावेळी केली.