Pune : आपले सरकार सोमवारपर्यंत बंद
Updated On:

पुणे : राज्य शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाकडून गुरुवारपासून आपले सरकार पोर्टल नियोजित देखभाल व हार्डवेअर अद्ययावत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
त्यामुळे दि. 14 एप्रिलपर्यंत आपले सरकार सेवा पोर्टलवरील सर्व सेवा आणि प्रणाली काही काळासाठी अनुपलब्ध राहतील, अशी माहिती शासनाकडून देण्यात आली.
दिनांक १० ते १४ एप्रिल २०२५ या कालावधीत बहुतांश दिवस सार्वजनिक सुट्ट्या असल्यामुळे नागरिकांनी आपले सरकार सेवा केंद्र, सेतू केंद्र चालवणाऱ्या कर्मचाऱ्यांनी, ग्रामपंचायतींनी तसेच शासनाच्या विविध विभागांतील कर्मचाऱ्यांनी आपापल्या सेवा संबंधित कामांचे नियोजन पूर्वीच करावे, असे आवाहन माहिती तंत्रज्ञान विभागाने केले आहे.





