प्रशासनासह राजकीय इच्छाशक्ती अभावी ढोबळ विकासकामे पुणे – शिवणे-खराडी रस्त्यासह अन्य मिसिंग लिंकचे रखडलेले काम, अनधिकृत बांधकामाचा फुटलेले पेव, उद्यानांची दुरावस्था, वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत सोयी-सुविधांचा अभाव, अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था, झोपडपट्यांचा रखडलेला पुर्नविकास अशा एक ना अनेक समस्यांनी प्रभाग क्र. ३० ला विळखा घातलेला आहे. या प्रभागात विकासाला गती देण्याची संधी असतानाही केवळ प्रशासकीय आणि राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे केवठ ढोबळ विकास कामे झाली आहेत. प्रभाग क्र. ३० कर्वेनगर-हिंगणे होम काॅलनी यामध्ये वारजे जकात नाका, कर्वेनगर, काकडे सिटी, कमिन्स काॅलेज, हिंगणे होम काॅलनी, तपोधाम, गोसावी वस्ती, श्रमिक वसाहत, मावळे आळी, वडार वस्ती या भागाचा समावेश होतो. या प्रभागात प्रभागात वडारवस्ती, श्रमीक वसाहत, गोसावी वस्ती, मावळे आळी या झोपडपट्टी आणि वस्तीचा मोठा भाग आहे. या वस्त्यांचा पुर्नविकास अनेक वर्षांपासून रखडला असून, नागरिकांना अस्वच्छ आणि दुर्गंधी असलेल्या परिसरात रहावे लागत आहे. दुसरीकडे शिक्षण संस्था, हाॅस्टेल यांचे प्रमाण अधिक असल्याने रस्ते अपुरे आणि कोंडी अधिक अशी स्थिती झाली आहे. मुख्य मार्गावरील आंबेडकर चौकातील कोंडी सोडविण्यासाठी उड्डाणपूल किंवा ग्रेड सेप्रेटरची आवश्यकता आहे. अनेक समस्या असताना करोना कालावधीसह महापलिकेवर लांबलेली प्रशासकीय राजवट तसेच राजकीय मतभेद यामुळेही विकासकामांना म्हणावी तशी गती मिळाली नाही. जावळकर उद्यानात मोनो रेले कधी सुरू तर कधी बंद, अनधिकृत बांधकामासह वाढत्या लोकसंख्येमुळे मूलभूत गरजा आणि सोयी-सुविधा अपुऱ्या, वारजे हायवे डुक्कर खिंडीकडून तिरूपतीनगर आणि मिलेनियम शाळेच्या मागील बाजूने येणारा मार्ग अपूर्ण आहे. हा मार्ग सुरू झाला तर वारजे आणि कर्वेनगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होईल, अशा अनेक समस्या कायम आहेत. अशी आहे राजकीय स्थिती… राजकीय पक्षाबरोबरच उमेदवारांच्या प्रामाणिक कामाला साथ देणारा हा प्रभाग आहे. त्यामुळेच २००७ मध्ये राजाभाऊ बराटे मनसेमधून निवडून आले तर २०१२ मध्येही बराटे यांच्यासह सुरेखा मकवान हे मनसेच्या तिकिटावर निवडून आले. बराटे यांची विकासकामे आणि मतदारांशी जोडलेली नाळ लक्षात घेत २०१७ मध्ये चारच्या प्रभागात भाजपने राजाभाऊ बराटे यांना पक्षात घेऊन विजयाची परंपरा सुरू ठेवली. त्यामध्ये सुशिल मेंगडे आणि वृषाली चौधरी भाजकडून विजयी झाले. तर, एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या लक्ष्मी दुधाने यांनी विजयी मिळवत भाजपच्या चौकटीला शह दिला. या प्रभागात मागील पाच वर्षात भाजपचे वर्चस्व असून, नव्याने संधी मिळालेल्यांना विकासाला गती देण्याची मोठी संधी होती. भाजपला यावेळच्या निवडणुकीत उमेदवारी देताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, शिवसेना आणि मनसे याची वाढती ताकद लक्षात घेऊन उमेदवारी जाहीर करावी लागणार. शिवणे-खराडी रस्ता, डुक्कर खिंड रस्ता आणि कर्वेनगर डीपी रस्त्याच्या कामासाठी पाठपुरावा केला. रस्ते, पाणी आणि ड्रेनेज लाइन ही महत्वाची कामे झाली आहेत. आरोग्य केंद्र आणि सम्राट अशोक विद्यालय बांधले. राजाराम पूल येथे वाॅकिंग प्लाझा. – राजाभाऊ बराटे, माजी नगरसेवक युवकांसाठी कौशल्य विकास केंद्र, कमिन्स जवळील अरूंद रस्त्याचे रूंदीकरण, उद्याने, क्रिडांगण उभारणी, जावळकर उद्यान ते तिरूपतीनगर उड्डाण पूल उभारणार, सर्वसामान्य मुलांसाठी शाळा आणि नागरिकांसाठी दवाखाने सुरू केले. -सुशिल मेंगडे, माजी नगरसेवक शिवणे-खराडी शंभर फुटी रस्त्याचे ८० टक्के काम पूर्णत्वाकडे, मिसिंग लिंक कामासह आंबेडकर चौकातील वाहतूक कोंडी सोडविणे आवश्यक. पौड फाटा-वारजे मेट्रोला मंजुरी मिळाली पण काम लवकर सुरू व्हावे. त्यामुळे वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल. – स्वप्निल दुधाने, माजी अध्यक्ष, कोथरूड विधानसभा कर्वेनगर गावठाण परिसराचा विकास आहे कुठे ? वाहने उभी करण्यासाठी जागा नाही, रस्त्यांवर खड्डे, मुलांना खेळण्यासाठी उद्याने किंवा मैदाने नाहीत. केवळ पोकळ आश्वासने दिली गेली आहेत. – विजय खळदकर, इच्छुक हे आहेत इच्छुक उमेदवार भाजप : राजाभाऊ बराटे, विठ्ठल बराटे, सुशिल मेंगडे, वृषाली चौधरी, डाॅ. एकता रामदासी, मानसी गुंड, महेश पवळे, विनोद मोहिते, विशाल रामदासी, जयदीप पारखी. राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार) : तेजल दुधाने, प्रवीण दुधाने, रेश्मा बराटे, मोहित बराटे, संगिता बराटे, आनंद तांबे. शिवसेना : प्रणव थोरात, अनिकेत जावळकर, प्रतिक्षा जावळकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार : लक्ष्मी दुधाने, स्वप्निल दुधाने, प्रमोद शिंदे, किशोर शेडगे, विष्णू सरगर, प्रा. मुक्ता थरकुडे निता शिंदे, पल्लवी शेडगे, सुनिता सरगर शिवसेना (उबाठा) : अजय भुवड, नंदू घाटे, जगदीश दिघे, मयुर वांजळे, दिनेश बराटे मनसे : सचिन विप्र, सुरेखा मकवान, संजय नागरे, शैलेश जोशी, अशोक कदम, आनंद पाटील, इतर : विजय खळदकर, विरेश शितोळे, केदार मारणे,