Pune: आर्किटेक्ट, इंजिनिअर्स, सर्व्हेअर्स असोसिएशन, पुणे (एईएसए) तर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा कमर्शिअल कॅटेगरीतील ज्युरी रेकमेंडेशन अॅवॉर्ड ‘ए अँड टी कन्सलटंट’चे प्रिन्सिपल आर्किटेक्ट विकास अचलकर व आर्किटेक्ट मनोज तातुस्कर यांना नुकताच प्रदान करण्यात आला. माऊंट क्लॅरिया प्रकल्पाच्या डिझाईनला पुरस्कार- बाणेर-पाषाण लिंक रोडवरील माँट व्हर्ट व कॉनबिल लँडमार्क्स एलएलपी या कंपन्यांच्या ‘माऊंट क्लॅरिया’ या कमर्शिअल प्रकल्पाच्या डिझाईनसाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे वेगळे डिझाईन तसेच सर्वांचे लक्ष वेधून घेणारे आकर्षक एलिव्हेशन डिझाईन हे या पुरस्काराचे प्रमुख निकष ठरले. ग्रँड शेरेटन येथे पुरस्कार सोहळा – हा पुरस्कार सोहळा शनिवारी, २१ मार्च रोजी ग्रँड शेरेटन येथे संपन्न झाला. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्सचे अध्यक्ष विलास अवचट यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. एईएसए पुणेचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव राजे, एईएसए पुणेचे अध्यक्ष आर्किटेक्ट महेश बांगड व एईएसए पुणेचे समन्वयक पराग लडके यांची या प्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. या प्रतिष्ठेच्या पुरस्काराबद्दल आर्किटेक्ट विकास अचलकर व आर्किटेक्ट मनोज तातुस्कर यांनी आनंद व्यक्त करत एईएसए, पुणेचे आभार मानले आहेत.