धनकवडी – धनकवडी-कात्रज डेअरी प्रभाग क्र. ३७ मध्ये शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार गिरिराज सावंत यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. धनकवडी येथील ग्रामदैवत जानूबाई मंदिरात विजय संकल्प करून प्रचाराचा नारळ वाढवण्यात आला. यावेळी निघालेल्या पदयात्रेस मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. विजयी घोषणा आणि उमेदवाराच्या स्वागतासाठी नागरिक स्वयंस्फुर्तीने पदयात्रेत सहभागी झाले होते. महिलांनी ठिकठिकाणी उमेदवारांचे औक्षण केले, तरुणाईचा उत्साह दिसून आला. नागरिकांशी संवाद साधताना गिरिराज सावंत म्हणाले की, हा केवळ जनसमुदाय नसून धनुष्यबाण आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामावर असलेला अढळ विश्वास आहे. विरोधकांचे धाबे दणाणले असून विकासाची ही घोडदौड आता कोणीही रोखू शकणार नाही. प्रभागातील रस्ते, पाणी आणि नागरी सुविधांच्या मुद्द्यावर गिरराज सावंत यांनी पुढाकार घेतला आहे. एकच ध्यास, प्रभागाचा विकास या ध्येयाने निघालेल्या या भगव्या वादळाने विरोधकांच्या गोटात अस्वस्थता निर्माण केली आहे.