बिबवेवाडी – महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रितम नागपूरे, गौरव घुले, अस्मिता शिंदे आणि रश्मी आमराळे यांनी प्रभाग क्र. २० मध्ये जनसंपर्क मोहिमेचा धडाका कायम ठेवला आहे. गेल्या दोन दिवसांत बिबवेवाडी गावठाण परिसरासह उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये उमेदवारांनी मतदारांशी थेट संवाद साधून आपल्या कार्याचा लेखाजोखा मांडला. बिबवेवाडी गावठाण आणि रम्यनगरी सोसायटी परिसरात प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. गावठाण परिसरातील मूळ रहिवाशांनी उमेदवारांचे जंगी स्वागत केले. यावेळी दादासाहेब लाठे, दिलीप बिबवे, विकी गव्हाणे, बबलु बागवान, रुपेश समेल आणि हेमंत परदेशी यासह परिसरातील मान्यवर उपस्थित होते. गावठाणातील संस्कृती जोपासत आधुनिक विकास साधण्याचे आश्वासन उमेदवारांनी यावेळी दिले. सुपार्श्वनाथ सोसायटी, मेघस्पर्श, माणिकमोती, क्षितिज आणि विद्याश्री सोसायटी या ठिकाणच्या रहिवाशांच्या भेटी घेत उमेदवरांनी मतदानाचे आवाहन केले. या दौऱ्यात हेमंत नाईकवाडी, कमलेश बेताला, प्रतिक कोळी, सिद्धार्थ नरवडे आणि मुन्ना पारखी या प्रमुख कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवून उमेदवारांच्या विजयाचा निर्धार केला. सुशिक्षित मतदारांनी उमेदवारांच्या अभ्यासपूर्ण भूमिकेचे कौतुक केले. या आक्रमक प्रचारामुळे आणि विविध स्तरांतील पाठिंबा मिळत असल्याने घड्याळाचे पारडे जड असल्याचा दावा उमेदवारांनी केला आहे.