Pune : आरटीईचे ६० हजार ९९५ प्रवेश
Updated On:

पुणे : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) शाळांमध्ये ६० हजार ९९५ बालकांचे प्रवेश झाले आहेत. प्रवेश जाहीर झालेल्या बालकांचे संबंधित शाळांमध्ये प्रवेश घेण्याची मुदत सोमवारी (दि.१०) संपणार आहे.
बालके प्रवेशापासून वंचित राहू नये यासाठी प्रवेशासाठी अनेकदा मुदतवाढही देण्यात आली. अद्यापही ४५ हजार ९२ एवढ्या प्रवेशाच्या जागा रिक्तच पडल्या आहेत.
पुणे जिल्ह्यातील ९६० शाळांमध्ये १८ हजार ४९८ प्रवेशाच्या जागांसाठी ६१ हजार ५७३ अर्ज दाखल झाले होते. प्रवेशासाठी १८ हजार १६१ बालकांची निवड करण्यात आली. त्यातील १० हजार ६५९ बालकांचे प्रवेश शाळामध्ये झाले आहेत.
उर्वरित बालकांचे आजूनही प्रवेश झालेले नाहीत. रिक्त जागांवरील प्रवेशासाठी आता प्रतिक्षा यादीतील बालकांना संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.




