पुणे – वडगावशेरी विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत पाच दिवसांत ४९ उमेदवारांनी ९२ अर्ज नेले आहेत. चार उमेदवारांनी अर्ज भरुनही दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी २९ अॉक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. उमेदवारी अर्ज विक्री व अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २२ अॉक्टोबरपासून सुरू झालेली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून बापुसाहेब पठारे व त्यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे यांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, बापुसाहेब पठारे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केल्यामुळे ते सोमवारी पुन्हा अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सुरेंद्र पठारे हे आपला अर्ज माघारी घेतील. राष्ट्रवादी कॉंग्रेस-अजित पवार पक्षाकडून विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांनी उमेदवारी जाहीर झालेली आहे. ते आपला उमेदवारी सोमवारी अर्ज दाखल करतील. बहुजन समाज पार्टीकडून चंद्रकांत सावंत, अपक्ष अभिमन्यू गवळी या दोघांनीही अर्ज दाखल केले आहेत. प्रामुख्याने सोमवारी, मंगळवारी बहुसंख्य उमेदवार जोरदार शक्तिप्रदर्शन करुन अर्ज दाखल करणार आहेत.