Pune : अकरावी प्रवेशासाठी ४ लाख ६६ हजार नोंदणी
Updated On:

पुणे : राज्य शालेय शिक्षण विभागाने अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू केली असून दोन दिवसात ४ लाख ६६ हजार ४९९ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. सोमवार (दि.२६) पासून विद्यार्थी नोंदणी व महाविद्यालय पसंतीक्रम नोंदणी सुरू झाली आहे.
२ लाख २७ विद्यार्थ्यांनी अर्ज, शुल्क भरुन नोंदणी केली आहे. १ लाख ७५ हजार ५८४ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग १ भरला आहे. ८१ हजार ७६६ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदवून अर्ज लॉक केले आहेत.
प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. येत्या ३ जून पर्यंत अर्ज नोंदणी करता येणार असल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ.महेश पालकर यांनी दिली.





