पुणे : शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास अल्पावधीतच आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्याने एका व्यावसायिकाची ३६ लाख ९२ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. याबाबत मुंढवा येथील ५७ वर्षीय व्यक्तीने खराडी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ ते ११ मार्च या कालावधीत ही घटना घडली. सायबर चोरट्याने तक्रारदार यांच्याशी साेशल मीडियाच्या माध्यमातून संर्पक केला. एका शेअर ट्रेडिंग कंपनीचे ते एजंट असल्याचे सांगितले. आकर्षक वाढीच्याआमिषाने एका व्हाॅटसॲप ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. सुरुवातीला गुंतवणुकीवर परतावाही दिला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे सांगत ३६ लाख ९२ हजार ६२७ रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानंतर काेणताही परतावा दिला नाही. याबाबत पुढील तपास वरिष्ठ पाेलीस निरीक्षक चव्हाण करीत आहेत.