पुणे – 30 हजार शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वेतनाविना

पुणे – जिल्ह्यातील 30 हजार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन अद्याप झालेले नाही. वेतनास विलंब झाल्याने शिक्षकांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. वेतन तातडीने व्हावे, अशी मागणी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांतून होत आहे.

वेतन वेळेवर न झाल्याने शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. बॅंकांचे हप्ते वेळेवर न भरल्याने अनेकांना दंडाचा भुर्दंड सहन करावा लागला आहे. याबाबत पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षकेत्तर संघटनेचे उपाध्यक्ष प्रसन्न कोसूळकर यांनी सांगितले, वेतन कार्यालयाकडे आवश्‍यक तो निधी उपलब्ध असतानाही केवळ दुर्लक्ष झाल्याने पगार रखडले आहेत. वैद्यकीय व रजा कालावधीतील मान्यतेचेही प्रस्ताव रखडले आहेत. मार्चच्या पगारास विलंब झाल्याने एप्रिल व त्यापुढील महिन्यांचेही पगार पुढे जाण्याची शक्‍यता आहे. त्याचा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागेल. त्यामुळे वेतन वेळेवर करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.