एमपीएससी उत्तरतालिका संकेतस्थळावर प्रसिद्ध

पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दि. 26 मे 2019 रोजी घेण्यात आलेल्या “महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा’ या स्पर्धा परीक्षेच्या वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या प्रश्‍नपत्रिकेच्या चारही संचाच्या प्रथम उत्तरतालिका (आन्सर की)उमेदवारांच्या माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

या परीक्षेसाठी उमेदवारांना प्रश्‍नपुस्तिकांच्या उत्तरतालिकेतील प्रश्‍नोत्तरासंबंधी हरकती अथवा निवेदने करावयाची असल्यास ती आयोगाने प्रसिद्ध केलेल्या हरकतीच्या नमुन्यातच करावयाची आहेत. आयोगाच्या संकेतस्थळावर हरकतीचा नमूना उपलब्ध आहे. उमेदवारांनी त्यांच्या हरकती परीक्षा नियंत्रक व सहसचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, 7 व 8 वा मजला, कुपरेज, मुंबई या पत्त्यावर पाठवावीत. या संदर्भात दि. 6 जूनपर्यंत आयोगाकडे पोहोचलेल्या हरकतींची दखल घेण्यात येईल. त्यानंतर आलेल्या हरकती विचारात घेतली जाणार नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.