पुणे – पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या येरवडा येथील डॉ.आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालय व बुद्धिस्ट सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभा घेण्यात आली. यावेळी महाविद्यालयाच्या “प्रज्ञा” या विशेष अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ.डी.जी. देशकर, पाहुणे माजी प्राचार्य डॉ. आर.एम. मिसाळ, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. गौतम बनसोडे, आयक्युएसी समन्वयक प्रा.डॉ.रुपेश थोपटे, पी.ई.एस. शाळेचे मुख्याध्यापक सुनील शिंदे आदींसह अन्य शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. “प्रज्ञा” या विशेष अंकात डॉ.आंबेडकराच्या विविध कार्याच्या पैलुंवरील विविध प्राध्यापकांच्या लेखांचा समावेश करण्यात आला आहे. डॉ.डी.जी. देशकर व डॉ.आर.एम. मिसाळ यांनी आपल्या भाषणाच्या माध्यमातुन डॉ.आंबेडकरांचा जीवनपटच उलगडला. डॉ.आंबेडकराचे विचार व कार्य प्रत्येकाने आत्मसात करुन त्याची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे, असे मतही व्यक्त करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.डॉ.श्रेयसी परब यांनी केले. प्रास्ताविक डॉ.गौतम बनसोडे यांनी केले. बुद्धिस्ट सेंटरचे समन्वयक प्रा. डॉ.आप्पाराव चव्हाण यांनी आभार मानले.