वाग्देव महाराज रथोत्सवानिमित्त “प्रभात’च्या पुरवणीचे प्रकाशन

वाठार स्टेशन – येथील श्री समर्थ भगवान वाग्देव महाराजांची 84 वी पुण्यतिथी व रथोत्सवानिमित्त दैनिक “प्रभात’ने प्रसिद्ध केलेल्या विशेष पुरवणीचे प्रकाशन कोरेगाव-खटाव मतदारसंघाचे नवनिर्वाचित आ. महेश शिंदे व कोल्हापूर येथील कण्हेरी मठाचे स्वामी मुप्पीन काडसिद्धेश्वर महाराजांच्या हस्ते करण्यात आले.
वाठार स्टेशन पंचक्रोशी व राज्यातून आलेल्या हजारो भाविकांच्या उपस्थितीत वाग्देव महाराजांचा रथोत्सव गुरुवारी उत्साहात झाला.
दैनिक “प्रभात’ने प्रसिद्ध केलेल्या श्री समर्थ वाग्देव महाराजांच्या रथोत्सव पुरवणीतील लेख वाचनीय आणि पुरवणी संग्राह्य असल्याचे कौतुक आ. शिंदे व काडसिद्धेश्वर स्वामींनी केले. यावेळी दैनिक “प्रभात’चे प्रशांत कुलकर्णी, संदीप राजे, वाठार स्टेशनचे प्रतिनिधी जलालखान पठाण, पंचायत समिती सदस्या मंगल गंगावणे, माजी सदस्य अंकुशराव जाधव, माजी उपसरपंच नागेश जाधव, सरपंच वृषसेन जाधव, माजी सरपंच केशवराव भोईटे, महेश लोंढे, माजी उपसरपंच संजय भोईटे, शंकर अहिरेकर, राम करे, निवृत्ती करे, डॉ. शिवाजी माने, यशवंत पवार, मनोज कलापट, राजेश काळोखे, मंगेश शितोळे, धनाजी मोहिते, हणमंत मांडवे व ग्रामस्थ उपस्थित होते.





