सातारा – 45 सातारा लोकसभा संघातील 256- वाई, 257 – कोरेगांव, 259- कराड उत्तर, 260 – कराड दक्षिण, 261- पाटण, 262 – सातारा विधानसभा मतदार संघ व 43 माढा लोकसभा मतदार संघातील 255 – फलटण (अ.जा.) 258- माण या विधानसभा मतदान संघामध्ये मंगळवार, दि. 23 एप्रिल 2019 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होणार आहे.
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडील राजपत्रानुसार मंगळवार दि. 23 एप्रिल 2019 रोजी मतदानाच्या दिवशी संबंधित मतदार संघात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. ही सार्वजनिक सुट्टी उपरोक्त नमूद करण्यात आलेल्या मतदार क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या त्या मतदार संघाच्या बाहेर असतील त्यांना देखील लागू राहील. शासनाकडील अधिसूचना शासकीय कार्यालये निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम व इतर प्रतिष्ठान यांनाही लागू आहे.असे श्वेता सिंघल जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, सातारा यांनी कळविले आहे.