पुणे | बदलापूर घटनेच्या निषेधार्थ काॅंग्रेस पक्षाचे आंदोलन
Updated On:

पुणे,{प्रभत वृत्तसेवा} – बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ काॅंग्रेस पक्षाने बालगंधर्व चौकात आंदोलन केले. या वेळी पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी राज्यमंत्री रमेश बागवे व माजी महापौर कमल व्यवहारे, संगीता तिवारी, मनीष आनंद, मुख्तार शेख,
हेमंत राजभोज, सुजीत यादव, अक्षय माने, अजीत जाधव, रमेश सकट, युवक अध्यक्ष सौरभ अमराळे, प्रकाश पवार आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
शिंदे म्हणाले, आपल्या लाडक्या बहिणी व मुली आज असुरक्षित आहेत. समाज तसेच राज्य सरकारने याबाबत सतर्कता बाळगण्याची गरज आहे. महिलांविरोधातील अत्याचारांच्या गुन्ह्यांची तातडीने चौकशी व्हायला हवी. तसेच अशा पद्धतीचे विकृत कृत्य करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी. या प्रकरणात नैतिक जबाबदारी घेऊन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा राजीनामा द्यावा.’




