पिंपरी | लोणावळ्यात भर पावसात निषेध मोर्चा

लोणावळा, (वार्ताहर) – लोणावळा शहरात महाविकास आघाडीकडून शनिवारी भर पावसात तोंडाला काळ्या फिती लावत छत्रपती शिवाजी महाराज चौकात बदलापूर येथील घटनेचा मुक निषेध करण्यात आला. त्यानंतर लोणावळा शहर पोलिसांना निवेदन देत कारवाईची मागणी करण्यात आली.
महाविकास आघाडीकडून शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. मात्र न्यायालयाच्या सूचनेचा आदर करत हा बंद मागे घेत केवळ सर्वत्र मुक मोर्चे व निषेध आंदोलन करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
त्याप्रमाणे लोणावळ्यात महाविकास आघाडीच्या वतीने पुकारलेला बंद मागे घेत, तोंडाला काळ्या फिती लावून निषेध नोंदविण्यात आला.
यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी प्रमोद गायकवाड, नासीर शेख, बाळासाहेब फाटक, मच्छिंद्र खराडे, निखिल कवीश्वर, बाळासाहेब पायगुडे, शादान चौधरी, आशिष ठोंबरे, राजू बोराटी,
मारुती खोले, सुधीर शिर्के, विनोद होगले, श्वेता वर्तक, फिरोज शेख, अय्याज शिकिलकर, सुधीर कदम आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
लोणावळा शहर पोलिसांकडे निवेदन दिल्यानंतर काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष या तिन्ही पक्षाचे अध्यक्ष तसेच प्रदेश व जिल्हा पदाधिकारी यांनी निषेध व्यक्त केला.





