पुणे जिल्हा | पौड येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे निषेध मोर्चा

पौड, (वार्ताहर) – बदलापूर येथे दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने पौडला तहसील कचेरीवर निषेध मोर्चा काढण्यात आला.
अत्याचार करणाऱ्या नराधमाला फास्टट्रॅक न्यायालयात फाशीची शिक्षा द्यावी तसेच पीडित मुलींच्या पालकांची तक्रार घेण्यासही तेरा तास लावणाऱ्या पोलिसांवरही कारवाई करावी, अशी मागणी पक्षाच्यावतीने करण्यात आली. यावेळी तहसीलदार रणजीत भोसले यांना निवेदन देण्यात आले.
पौडलां तहसील कचेरीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर झालेल्या या निषेध आंदोलनात पक्षाचे तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे, दगडूकाका करंजवणे, सविताताई दगडे,कोमल वाशिवले, तालुका युवक अध्यक्ष प्रवीण धनवे, बाबाजी शेळके, प्रसन्न ओझरकर, दिपाली कोकरे, गौरी भरतवंशी, निकिता रानवडे,
राहुल पवळे, रूपाली अमराळे, शितल अमराळे, विलास अमराळे, शशिकांत नांगरे, योगेश ठोंबरे, कैलास वाघ, माऊली आखाडे, नाना शिंदे, निलेश चवले, प्रमोद मरगळे, साईदास शिंदे, लक्ष्मण मारणे, सुनील मोहोळ, आप्पा टेमघरे त्याचप्रमाणे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.





