पुणे जिल्हा | आमदार गायकवाडां विरोधात इंदपुरात आंदोलन

इंदापूर, (प्रतिनिधी) – शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी काँग्रेसचे नेते व देशाचे विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी यांच्या बद्दल वादग्रस्त विधान केल्याने त्याच्या निषेधार्थ इंदापूर शहरात भीमशक्ती सामाजिक संघटनेचे अध्यक्ष खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या मार्गदर्शनाखाली निषेध आंदोलन करण्यात आले.
इंदापूर शहरातील प्रशासकीय भवन येथे बुधवारी (दि. 18) भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने राहुल गांधी के सन्मान में भीमशक्ती मैदान मे! असे म्हणत हे निषेध आंदोलन करण्यात आले.
या वेळी आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली. प्रशासकीय भवनात बारामतीचे प्रांताधिकारी वैभव नावडकर व पोलिस प्रशासनाला तसे निवेदन देण्यात आले.
संघटनेचे तालुकाध्यक्ष युवराज पोळ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात हमीद शिकलकर, दादासाहेब पोळ, तुकाराम मिसाळ, नवनाथ गायकवाड, रुस्तुम पठाण,
राहुल बोबडे, पांडुरंग मोहिते, आकाश चव्हाण, विशाल लांडगे, सुदाम मिसाळ, संतोष घाडगे, किरण मिसाळ, विकास मुंडासे, दत्ता कुचेकर, संतोष चव्हाण, सिद्धार्थ चव्हाण यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.





