आंतरजातीय मुलाच्या प्रेमात पडलेल्या मुलीस संरक्षण द्या – उच्च न्यायालय

आई-वडिलांपासून वाचवा

आंतरजातीय मुलाच्या प्रेमात पडलेल्या मुलीची हायकोर्टात याचिका ;न्यायालयाकडून गंभीर दखल

मुंबई  – आंतरजातीय मुलाच्या प्रेमात पडलेल्या १९ वर्षांच्या मुलीने उच्च न्यायालयात धाव घेऊन आम्हाला आई-वडीलांबरोबरच कुटूंबियांकडून जिवितास धोका असल्याने २४ तास पोलीस संरक्षण द्या, अशी विनंती करणारी याचिका काल उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेची गंभीर दखल घेत न्यायालयाने आज तातडीने त्यावर सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता उच्च न्यायालयाने तळेगाव येथील पोलिसांना रीतसर तक्रार घेऊन मुलीच्या सुरक्षेची उपाय करण्याचे आदेश दिले आहेत.

पुण्याच्या या मुलीच्या वतीने ऍड. नितीन सातपूते यांनी दाखल केलेल्या याचिकेची सुटीकालीन न्यायालयाचे न्यायमूर्ती एम.एस. कर्णिक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठाने तातडीने दखल घेतली आहे. पुण्यातील उंबरे गावची 19 वर्षांची मुलगी लॉ अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षात शिकत असताना कथित निम्न जातीमधील 19 वर्षीय मुलाच्या प्रेमात पडली. हे प्रेम प्रकरण घरच्यांना समजल्यानंतर आई-वडिलांनी तिला शिक्षणापासुन वंचित ठेवण्याचा निर्णय घेतला. तसेच कॉलेजमध्ये जाण्यासही बंदी घातली. एवढ्यावरच कुटूंब थांबले नाही तर पेशाने वकील असलेल्या काकाने संतापाच्या भरात गावढी कट्टा आणून थेट डोक्‍याला लावून धमकावले. हे प्रेमसंबंध तोडले नाही तर दोघांनाही जीवे मारण्याची धमकीही त्यांनी दिली. शिवाय हे प्रेमप्रकरण थांबवले नाही तर मुलाला अपहरण व बलात्काराच्या खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकीही दिली. त्यामुळे मुलीने थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामुळे उच्च न्यायालयाने आज तातडीने सुनवाई घेत पोलिसांना मुलीच्या सुरक्षेचे आणि तक्रार नोंदवून घेण्याचे निर्देश दिले आहेत.

आंतरजातीय मुलाच्या प्रेमात पडलेल्या मुलीची हायकोर्टात याचिका –

आई-वडीलांपासून वाचवा

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.