पिंपरी | महापालिकेतील अनेक अधिकार्यांना पदोन्नती

पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिका स्थापत्य विभागाचे सहशहर अभियंता म्हणून कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे, विजयकुमार काळे यांना सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती दिली आहे. राणे यांच्याकडे पाणीपुरवठा विभाग आणि काळे यांच्याकडे झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन स्थापत्य, पंतप्रधान आवास विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.
क क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी व झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाचे सहायक आयुक्त अण्णा बोदडे यांना उपायुक्त म्हणून पदोन्नती दिली आहे. ई क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी तथा सहायक आयुक्त राजेश आगळे यांनाही उपायुक्त म्हणून पदोन्नती दिली आहे.
झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाचे प्रशासन अधिकारी श्रीकांत कोळप आणि भूमी व जिंदगी विभागाचे प्रशासन अधिकारी मुकेश कोळप यांची सहायक आयुक्त म्हणून पदोन्नती केली आहे. आयुक्त शेखर सिंह यांनी आदेश दिले आहेत. तर सोलापूर जिल्ह्यातील माढा नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी पूजा दुधनाळे या महापालिकेत प्रशासन अधिकारी म्हणून रूजू झाल्या आहेत.





