Vicky Kaushal : ‘छावा’चं पाटण्यात प्रमोशन अन् विकीने ‘लिट्टी चोखा’वर मारला ताव; इन्स्टावर फोटो केला शेअर, चाहत्यांकडून कमेंट्सचा महापूर

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल ‘छावा’ या ऐतिहासिक चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांची व्यक्तीरेखा साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट १४ फेब्रुवारीला देशभरात प्रदर्शित होत आहे, त्यामुळे विकी या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अभिनेता विकी कौशल छावाच्या प्रमोशनसाठी जयपूरला पोहोचला आहे. शनिवारी पाटण्याला पोहोचल्यावर त्याने रस्त्यावरील एका स्टॉलवर ‘लिट्टी चोखा’वर ताव मारत खाण्याचा आनंद लुटला. याची पोस्ट त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून त्याच्या चाहत्यांसाठी शेअर केली आहे.
शेअर केलेल्या फोटोत विकी पारंपारिक बिहारी पदार्थांचा आस्वाद घेताना दिसत आहे. यावेळी विकी अगदी साध्या स्टाईलमध्ये एका फूड स्टॉलसमोर उभा असल्याचे दिसत आहे. त्याच्यासोबत सुरक्षा रक्षक उभे आहेत आणि पोलीस बंदोबस्तही तैनात आहे. विकी फूड स्टॉलच्या बाजूला पांढरा कुर्ता-पायजमा आणि काळ्या रंगाचा चष्मा घालून लिट्टी-चोखा खात आहे.
हा फोटो शेअर करताना विकीने कॅप्शनमध्ये लिहिले – “पटनाला आल्यानंतर तुम्ही लिट्टी चोखा कसा मिस करू शकता??? व्वा. या फोटोला त्याच्या चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की जीममध्ये तासनतास घालवणाऱ्या विकीला जेवणाची खूप आवड आहे.
विकीचे आगामी प्रोजेक्ट लवकरच अॅानफ्लोअर
विकीच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचे झाले तर ‘छावा’ मध्ये तो दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे. छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा या चित्रपटातून पाहिला मिळणार आहे. १४ फेब्रुवारीला हा चित्रपट देशभरातील चित्रपटगृहात रिलीज होत आहे. याशिवाय विकी संजय लीला भन्साळींच्या ‘लव्ह अँड वॉर’ मध्येही दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत रणबीर कपूर आणि आलिया भट्ट देखील दिसणार आहेत. यापूर्वी विकीने रणबीरसोबत संजू आणि आलियासोबत राझीमध्ये काम केले होते.





