भारतीय वस्त्रोद्योगात जपानी गुंतवणुकीला चालना; तांत्रिक सहकार्याचाही विचार
Updated On:

नवी दिल्ली – भारतातील कापड आणि वस्त्रोद्योग क्षेत्रात जपानमधील कंपन्या गुंतवणूक वाढविणार असल्याची माहिती कापड निर्यात प्रोत्साहन परिषदेच्या अधिकार्यांनी दिली.
या संघटनेचे अध्यक्ष सुधीर शेखरी यांनी सांगितले की, जपानमध्ये सध्या चालू असलेल्या वस्त्रोद्योग प्रदर्शनात भारतातील अनेक कंपन्यांनी भाग घेतला असून जपानमधील कंपन्यांनी भारतात या संदर्भात गुंतवणूक आणि तांत्रिक सहकार्य करण्यासाठी पुढाकार घेण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.
भारतातील वस्त्रोद्योग क्षेत्र निर्यात क्षेत्रात आगेकूच करीत असून जर जपानमधील उद्योगाची भारताला मदत मिळाली तर या क्षेत्रात भारत आणखी पुढे जाऊ शकेल असे समजले जाऊ लागले आहे. सध्या केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह टोकियो येथे आहेत.





