बीड – अकॅडमीतील प्राध्यापकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीड शहरातील नाथसृष्टी अंकुशनगर भागात घडली आहे. राजाराम शिवाजी धस (वय 40, अंकुशनगर, बीड) असे आत्महत्या केलेल्या प्राध्यापकाचे नाव आहे.
राजाराम धस हे शहरातील जिज्ञासा ॲकॅडमीचे माजी संचालक आहेत. तर ब्राईट ॲकॅडमीत ते प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. येथे ते स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांची तयारी करून घेत होते. धस यांनी आज त्यांच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्राध्यापक राजाराम धस यांनी आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास शिवाजीनगर पोलिस करत आहेत.
दरम्यान, बीड जिल्ह्यात आत्महत्याचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसांपूर्वी एकाच दिवशी चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. तर काल एकाच दिवशी दोघांनी आत्महत्या केल्याचे समोर आले होते.